शहागड : अवैध वाळू उपशामुळे गोदावरी नदीपात्राची अक्षरशः चाळणी झाली आहे. यामुळे नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरम्यान, अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील दोन तरुण गोदावरी नदीत पोहत होते. नदीतील खड्यांमुळे पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार, 31 मे रोजी सकाळी ९ वाजता घडली. ज्ञानेश्वर बाबुराव खराद ( १९, रा. डोमलगाव ता. अंबड ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

इम्तियाज मणियार/ शहागड : अवैध वाळू उपशामुळे गोदावरी नदीपात्राची अक्षरशः चाळणी झाली आहे. यामुळे नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरम्यान, अंबड तालुक्यातील डोमलगाव येथील दोन तरुण गोदावरी नदीत पोहत होते. नदीतील खड्यांमुळे पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार, 31 मे रोजी सकाळी ९ वाजता घडली. ज्ञानेश्वर बाबुराव खराद ( १९, रा. डोमलगाव ता. अंबड ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
डोमलगाव येथील महाविद्यालयीन तरुण ज्ञानेश्वर खराद मित्रासह गोदावरी नदीच्या पात्रात पोहोचण्यासाठी गेला होता. बेसुमार अवैध वाळू उपशामुळे गोदापात्रातील मोठ्या खड्ड्यांचा अंदाज पाण्यात उतरल्यावर त्याला आला नाही. ज्ञानेश्वर खराद हा बुडाला. खूप वेळ झाल्यावर देखील तो वर आलाच नाही. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाने वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण् तो निष्फळ ठरला. दरम्यान, ज्ञानेश्वर खराद हा बुडाल्याची माहिती दुसऱ्या तरुणाने गावात सांगितले. ग्रामस्थांनी तत्काळ गोदावरी नदीपात्राकडे धाव घेतली. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोहणारे ग्रामस्थ व मासेमारी करणारे तरुण गोदावरी पात्रात उतरले. तब्बल दोन तास शोध घेतल्यानंतर तरुणाचा मृतदेह सापडला. ज्ञानेश्वरच्या मृत्यूमुळे खराद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून डोमलगाव गावावर शोककळा पसरली आहे.
कुटुंबात एकुलता एक
ज्ञानेश्वर खराद नुकतीच बारावीच्या परीक्षेत पास झाला होता. पुढील शिक्षणासाठी एडमिशनची प्रोसेस सुरू होती. मात्र , त्याआधीच काळाने त्याला हिरावून नेले. खराद कुटुंबात तो घरात एककुलता एक होता. त्याला दोन बहिणी आहेत.
अमर्याद वाळू उपसा
जालना जिल्ह्यातील दक्षिण गंगा म्हणून गोदावरी नदीकडे पाहिले जाते. ही नदी जिल्हयाच्या दक्षिणेकडील सीमावर्ती भागातून जाते. त्यामुळे हा नदीपट्टा वाळू माफियांचा अड्डा बनला आहे. या भागांतील नदीच्या पात्रातून दिवसरात्र अमर्याद वाळू उपसा केला जातो. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
घटना दुर्दैवी; वाळू उपशावर कारवाई सुरूच
पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एका तरुणाचा पाण्यात बुडून झालेला मृत्यू झाला ही दुर्दैवी आहे.
अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाची भूमिका कठोरच आहे. वाळू माफियांच्या बाबतीत ‘झिरो टॉलरंस’ ही माझी भूमिका आहे.
– विजय चव्हाण,, तहसीलदार, अंबड