dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दहशतवादाप्रमाणे भ्रष्ट्राचारही देशासाठी घातकच; भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कारवाई करावी : वसंतराव देशमुख 

जाफराबाद : देशाला दहशतवादी व परकीय शक्तींपासून जसा धोका निर्माण झाला होता.  भारत सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन शत्रूला धूळ चारली.  दहशतवादाप्रमाणे देशात वाढलेला भ्रष्टाचारही देशासाठी घातकच आहे. त्यावरही सरकारने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची अपेक्षा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी केली आहे.

    प्रत्येक क्षेत्रात कमालीचा भ्रष्टाचार वाढला आहे. सरकारचे भ्रष्टाचारावर कोणतेच नियंत्रण नसल्याने सरकारी तिजोरीवर अनेक भ्रष्टाचारी डल्ला मारत आहेत. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रातही कमालीचा काळा बाजार झाला आहे आणि होत आहे. दररोज नवनवीन खुलासे पहावयास मिळत आहेत.  अशा दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही.

कृषी विभागामध्येही अनेक भ्रष्टाचार उघडकीस आले असून कोणत्याच अधिकाऱ्यांवर किंवा पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही. महसूल विभागातील भ्रष्टाचारावर बोलण्यास शब्दच शिल्लक नाहीत.  वाळू माफीयांना अभय कोण देते याविषयी तर सर्व जनतेलाच माहिती आहे. देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून

 भ्रष्टाचारापासून देशाला मुक्त करण्याची मागणी करणार असल्याचे वसंतराव देशमुख यांनी सांगितले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top