छत्रपती संभाजीनगर: केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असून त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी नगरसेवक अक्षय देशमुख यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अल्पसंख्यांक विभागाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागामार्फत परभणी येथे आढावा बैठक आमदार इद्रीस नाईकवाडी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष नासेर शेख, माजी नगरसेवक अक्षय देशमुख, जाकेर लाला, पाशा कुरैशी, विकास लंगोटे, अहेमद कलीम अन्सारी, वसीम कबाडी, नागेश सोनपसारे, नदीम काजी, आकाश लहाने, खोबे, शकील शेख, अखिल शेख, नाझिम शेख, अश्फाक शेख, खालेद शेख आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी नगरसेवक अक्षय देशमुख म्हणाले की, शेतकरी, विधवा महिला, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा आ. इद्रीस नाईकवाडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.