dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या ; मालेगाव पोलिसांनी २४ तासांत उलगडला खून

मेडशी  :   मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी शिवारात आढळलेल्या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडले. अनैतिक संबंधांमुळे पती अडसर ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजून दोरीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

मेडशी  :   मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी शिवारात आढळलेल्या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उलगडले. अनैतिक संबंधांमुळे पती अडसर ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजून दोरीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

मृतकाचे नाव सुरेश राजाराम झळके (वय ३०, रा. अमानी, ता. मालेगाव) असे आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आशा सुरेश झळके (पत्नी) व महादेव बजरंग अंभोरे (वय २५, रा. पूर, ता. मंगरुळपीर) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश झळके हा गेल्या काही दिवसांपासून वाकळवाडी येथील सासुरवाडीत वास्तव्यास होता. ३० जुलै रोजी वाकळवाडी शिवारातील एका शेतात त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी मृताची पत्नी व तिच्या कथित प्रियकराची चौकशी केली. कसून चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधांमध्ये पती अडथळा ठरत असल्याने आरोपींनी त्याला संपविण्याचा कट रचला. ३० जुलै रोजी सुरेश याला मोठ्या प्रमाणात मद्य पाजल्यानंतर तो बेशुद्धावस्थेत असताना दोरीने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर हा प्रकार आत्महत्या अथवा अपघात असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी मृतदेह शेतात टाकण्यात आला. या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासानंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुधाकर आढे, मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश खेरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक गोखले तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

गळ्यावरील खुणांमुळे उलगडले हत्येचे गूढ

वाकळवाडी शिवारात सुरेश झळके यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. मात्र मृताच्या गळ्यावरील संशयास्पद खुणा आणि शवविच्छेदन अहवालातून हा मृत्यू नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत मृताची पत्नी आशा झळके आणि तिचा कथित प्रियकर महादेव अंभोरे यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान दोघांनीही पतीची हत्या केल्याची कबुली दिल्याने या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top