dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वांगीण उपायांना प्राधान्य :  प्रधानमंत्री मोदी 

मुंबई/भिल्डी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २४ व्या हप्त्यापोटी गुजरात मधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत १ हजार ८३५ कोटी रुपयांचा निधी थेट जमा केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सहाय्याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, सिंचन, पशुपालन आणि पूरक व्यवसायांना प्राधान्य देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1835 कोटी जमा

मुंबई/भिल्डी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २४ व्या हप्त्यापोटी गुजरात मधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमात  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत १ हजार ८३५ कोटी रुपयांचा निधी थेट जमा केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सहाय्याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, सिंचन, पशुपालन आणि पूरक व्यवसायांना प्राधान्य देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

             या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थान येथून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग घेतला. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री मोदी म्हणाले, केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांना ५० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली अथवा त्यांच्या खर्चात बचत झाली आहे. देशातील ८५ टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या लहान शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ४ लाख कोटी रुपये थेट बँक खात्यांत देण्यात आले आहेत. जागतिक बाजारात खतांच्या किमती वाढल्यानंतरही केंद्र सरकारने त्याचा भार शेतकऱ्यांवर पडू दिला नाही. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने सुमारे १६ लाख कोटी रुपये खर्च केले. गेल्या १२ वर्षांत गहू आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून २४ लाख कोटी रुपये देण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांना २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक भरपाई मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

सौरपंपांमुळे डिझेलची बचत 

सिंचनावरील खर्च कमी करण्यासाठी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १२ लाख सौरपंप देण्यात आले आहेत. या पंपांमुळे शेतकऱ्यांची ८० कोटी लिटरपेक्षा अधिक डिझेलची बचत झाली आहे. याशिवाय अतिरिक्त वीज निर्मितीचाही शेतकऱ्यांना लाभ होत असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट केले.

शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेसाठी : मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देशातील जनतेची सेवा करत राहतील. देश संकटात असताना विरोधक आनंद साजरा करत असल्याचा आणि पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर खते व स्वयंपाकाच्या गॅसच्या उपलब्धतेबद्दल लोकांमध्ये घबराट पसरवत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. मोदी म्हणाले की, शेतकरी, तरुण आणि महिला विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करत आहेत, परंतु खेदाची गोष्ट म्हणजे, काही लोक देशाच्या प्रगतीवर समाधानी नाहीत. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील भिल्डी येथे ‘भारत बोवाइन ब्रीडिंग अँड रिसर्च सेंटर’चे उद्घाटन आणि १४,००० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधान जाहीर सभेला संबोधित करत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top