जालना : तालुक्यातील गोंदेगाव फाट्यावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार, 25 एप्रिल रोजी घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून देवमूर्ती गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रगुण पंढरीनाथ फुलझाडे (वय २८) आणि यशवंत शामराव मिसाळ (वय ३२, दोघेही रा. देवमूर्ती) हे दुचाकीवरून प्रवास करत होते. गोंदेगाव फाट्याजवळ ते पोहोचताच समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, अपघातानंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे देवमूर्ती गावात शोक व्यक्त केला जात असून हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कार चालकाचा शोध घेतला जात आहे.