dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

एन्गिडीला गंभीर दुखापत; रुग्णवाहिकेला मैदानात बोलवावे लागले 

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या ३५ व्या सामन्यादरम्यान तिसऱ्या षटकात एक चिंताजनक घटना घडली. प्रियांश आर्यने अक्षर पटेलच्या एका ‘फुल’ चेंडूवर फटका मारला चेंडू हवेत उडाला आणि लुंगी एन्गिडीने ‘मिड-ऑफ’ क्षेत्रातून मागे धावत जाऊन तो झेल घेण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या ३५ व्या सामन्यादरम्यान तिसऱ्या षटकात एक चिंताजनक घटना घडली. प्रियांश आर्यने अक्षर पटेलच्या एका ‘फुल’ चेंडूवर फटका मारला चेंडू हवेत उडाला आणि लुंगी एन्गिडीने ‘मिड-ऑफ’ क्षेत्रातून मागे धावत जाऊन तो झेल घेण्याचा प्रयत्न केला. झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चुकीच्या अंदाजामुळे तो मागे पडला आणि त्याचे डोके जमिनीवर जोरात आदळले. पडल्याबरोबरच त्याने आपले डोके धरले आणि काही काळ तो मैदानावरच पडून राहिला. वैद्यकीय पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी उपचार करण्यास सुरुवात केली. परिस्थिती गंभीर असल्याचे वाटल्याने वैद्यकीय पथक तातडीने मैदानात धावले आणि साधारण चार मिनिटांनंतर त्याला स्ट्रेचरवरून  रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले. या दुखापतीमुळे खेळ थांबवण्यात आला होता आणि साधारण १५ मिनिटांनंतर तो पुन्हा सुरू झाला.  

लुंगी एन्गिडीच्या दुखापतीमुळे तो आता सामन्यातून पूर्णपणे बाहेर झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने दुश्मंथा चमीराचा बदली खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. या सामन्यात जेव्हा लुंगी एन्गिडी जखमी झाला, तेव्हा त्याला तपासण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यासह मैदानातील सर्व खेळाडू घाबरलेले दिसले. यावेळी स्टेडियममधील प्रेक्षकही खूप शांत दिसत होते. 

आयपीएल २०२६ च्या ३५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्ससमोर २६५ धावांचे लक्ष्य ठेवले. अरुण जेटली स्टेडियमवर, दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने आपल्या निर्धारित २० षटकांत २ गडी गमावून एकूण २६४ धावा उभारल्या. हा या हंगामातील आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ठरला आहे. ५ षटकांच्या अखेरीस पंजाबने कोणत्याही गड्याचा बळी न गमावता ९० धावा केल्या. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top