dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मेडशीतील ‘शाहबाबू फर्निचर’ला भीषण आग; लाखोंची संपत्ती जळून खाक

मेडशी   : मेडशी-मालेगाव रोडवरील ‘शाहबाबू फर्निचर’ या दुकानाला शनिवारी (दि. २५ एप्रिल) पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांची हानी झाली. या आगीत पलग, टेबल, सोफासेट, कपाट तसेच सागवानाचे कापून ठेवलेले लाकूड आणि मशिनरी जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलीस चौकीचे कर्मचारी विनोद इंगळे व ज्ञानेश्वर सानप यांनी तात्काळ मालेगाव येथील अग्निशामन दलाला कळवले. अग्निशामन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनीही जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र मोठे नुकसान टळू शकले नाही. 

या आगीत दुकानमालक शेख रशीद यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून काही तासांतच संपूर्ण दुकान जळून खाक झाले. मेडशी परिसर सागवान फर्निचरसाठी ओळखला जात असून येथील उत्पादनाला राज्यासह बाहेरील भागातही मोठी मागणी आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top