dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘धुरंधर’ वाघाला मिळाली जोडीदार ; ‘ज्ञानगंगा’मध्ये वाघीण दाखल

बुलढाणा : जिल्ह्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील प्रजननक्षम वाघांची संख्या प्रस्थापित करण्याच्या हेतूने ज्ञानगंगा अभयारण्यात यापूर्वी ‘धुरंधर’ नामक वाघाला सोडण्यात आले होते. दरम्यान रविवारच्या रात्री ज्ञानगंगामध्ये वाघीण दाखल झाल्याने धुरंधरला जोडीदार मिळाला आहे.

   वन विभागाने  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून  दोन वर्षांच्या वाघिणीला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडले. यापूर्वी जानेवारीमध्ये ज्ञानगंगामध्ये  पुनर्वसित वाघ ज्याला धुरंधर म्हणून ओळखले जात होते, त्याच्याशी  जोडी जमवणे हा यामागील उद्देश आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन  वाघीण ताडोबाच्या मोहर्ली रेंजमधील प्रसिद्ध ‘कॉलरवाली’ वाघिणीच्या तीन बछड्यांपैकी एक आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या पथकाने रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तिला ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातून पकडले आणि त्यानंतर रात्री २०५ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या ज्ञानगंगाअभयारण्यात सोडले. धुरंधर वाघाने अभयारण्याच्या वातावरणाशी चांगले जुळवून घेतले असून त्याची तेथील उपस्थिती सकारात्मक ठरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top