dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बेशिस्त 1215 रिक्षांवर पोलिसांची कारवाई : वाहतूक शाखेने वसूल केला 1 लाख 40 हजाराचा दंड

छत्रपती संभाजीनगर :  प्रवाशांशी उध्दटपणे वर्तन करणाऱ्या तसेच बेशिस्तपणे रिक्षा चालविणाऱ्या 1215 रिक्षांवर शहर वाहतूक शाखा पोलिसांनी विशेष मोहिम राबवून कारवाई केली. या कारवाईदरम्यान शहर वाहतूक शाखा पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांवर 11 लाख 52 हजार 500 रुपयांचा दंड आकारत एक लाख 39 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांनी बुधवार, 29 जुलै रोजी दिली. तसेच या कारवाईदरम्यान पोलिसांनी सहा रिक्षा जप्त केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवाशांशी उध्दटपणे वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकांना आळा बसावा, रिक्षा थांब्यावर बेशिस्तपणे रिक्षा लावणे, विना गणवेश रिक्षा चालविणे, फ्रंटसीट प्रवाशी बसविणे, विना लायसन्स, मोठया प्रमाणात प्रलंबित दंड असलेल्या रिक्षा, अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहर वाहतूक शाखेला दिले होते. पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेखा लोढे, मंगेश जगताप, पवन चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे, सचिन मिरधे आदींच्या पथकाने मंगळवार, 28 जुलै रोजी सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत रिक्षांची विशेष तपासणी मोहिम राबवली.

दरम्यान,  या मोहिमेअंतर्गत शहर वाहतूक शाखा पोलिसांनी 1215 रिक्षांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालकांना 11 लाख 52 हजार 500 रुपयांचा दंड आकारला. तसेच त्यांच्याकडून एक लाख 39 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.शहर वाहतूक शाखा पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांवर केलेल्या धडक कारवाईमुळे रिक्षाचालकांत एकच खळबळ उडाली आहे. रिक्षाचालकांनी गणवेश परिधान करुन, रिक्षाची कागदपत्रे सोबत बाळगावीत असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top