dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पूर्णा नदीत पाय घसरून दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू.’

नांदुरा :   नांदुरा शहरातील दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचा नदीत पाय घसरून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 12 जुलैच्या सकाळी 9 वाजे दरम्यान येरळी नजिक पूर्णा नदीकाठावर उघडकीस आली आहे. शहरातील वार्ड क्र.1 मधील कृष्णा बाळू भोपळे (14) व प्रतीक शिवलाल वानखेडे (12) असे मृत मुलांची नावे असून या दुर्दैवी घटनेमुळे नांदुरा शहरात शोककळा पसरली आहे.

     याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नांदुरा शहरातील एकूण तीन मुले आज शाळेला सुटी असल्याने कुतूहलातून पूर्णा नदीला आलेल्या पूराला पाहण्यासाठी गेले होते. येरळी नजिक असलेल्या नदी काठावर ही मुले गेल्यानंतर कृष्णा बाळू भोपळे व प्रतीक शिवलाल वानखेडे या दोघांचा पाय घसरल्याने ती दोघेही नदीपात्रात बुडाल्याचे दिसताच जवळच मच्छीमार करणाऱ्या तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करत त्यांना बाहेर काढले. सदर घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन जलमित्र पथकातील गोपाल फंड, उमेश पाखरे, विकास पाखरे, प्रद्युम्न पाखरे आणि राजू पाखरे, विलास निबोळकर,राहुल निमकडे,कृष्णा वसोकार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत उर्वरित बचावकार्य केले. त्यानंतर दोन्ही मुलांना नांदुरा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नांदुरा शहरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top