dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

32 टन वॉशिंग पावडर भरलेला ट्रक घुसला लॉजमध्ये एकाचा मृत्यू ः धुळे-सोलापूर महामार्गावरील घटना 

छत्रपती संभाजीनगर :   शहराजवळील करोडीजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर भरधाव ट्रकचा ताबा सुटून तो थेट रस्त्यालगत असलेल्या दामोधरण लॉजमध्ये घुसला. यात ट्रकमधील एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवार, 12 जूनला दुपारी 1 च्या सुमारास घडली. सुदैवाने लॉजमध्ये कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. 

या घटनेची अधिक माहिती अशी की, जीजे 04 एएक्स 9799 क्रमांकाचा ट्रक लासूरकडून छत्रपती संभाजीनगरला येत होता. ट्रकमध्ये सुमारे 32 टन वॉशिंग पावडरचा माल भरलेला होता. करोडी पुलाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट दामोधरण लॉजमध्ये घुसला. अपघातात चालक व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. हे लॉज विलास जाधव यांचे मालकीचे असून, गणेश साळुंके व राजेश जमधडे हे ते भाडेतत्त्वावर चालवतात. अपघातात लॉज व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाळूज वाहतूक शाखा पोलीस, दौलताबाद पोलीस, स्थानिक नागरिक व महामार्ग सुरक्षा पथकाने तत्काळ मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top