dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

“तुला घड्याळ घेऊन देतो, आम्ही घरात आलो हे सांगू नको!” अन्… बुलढाण्याच्या राजेश्वर नगरात काय घडलं?

बुलढाणा : शहरातील राजेश्वर नगर भागातील एका घरातून तब्बल २ लाख २८ हजारांची रोकड लंपास झाल्याची घटना ९ जून रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी, एका खाजगी संस्थेत नोकरीवर असलेल्या दांपत्याने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून दोन अल्पवयीन मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा : शहरातील राजेश्वर नगर भागातील एका घरातून तब्बल २ लाख २८ हजारांची रोकड लंपास झाल्याची घटना ९ जून रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी, एका खाजगी संस्थेत नोकरीवर असलेल्या दांपत्याने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून दोन अल्पवयीन मुलींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनिता प्रमोद गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बुलढाणा शहरातील गोडे कॉलेज मार्गावरील राजेश्वर नगरात त्यांचे घर असून पती आणि आपल्या दोन मुलींसह त्या तिथे राहतात. नोकरीच्या कामकाजामुळे पती आणि त्या स्वतः सकाळी ९ वाजे दरम्यानच घराबाहेर पडतात. मोठी मुलगी दहावीत असल्याने तीही शिकवणीला जाते. लहान मुलगी आणि बहिणीचा मुलगा स्विमिंगसाठी जात असतात, त्या व्यतिरिक्त ते घरातच असतात. वरच्या मजल्यावर ते स्वत: राहतात आणि खालील चारही खोल्या भाड्याने दिलेल्या असून त्यापैकी, दोनमध्ये एक कुटुंब आणि प्रत्येकी एक खोलीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुले आणि दोन अल्पवयीन मुली राहतात. यातील दोन मुली आमच्या घरामध्ये टिव्ही पाहण्यासाठी व मुलांसोबत खेळण्यासाठी येत असतात, असे तक्रारीत म्हटले आहे. घरी फर्निचरचे काम सुरू असल्याने २८ जून रोजी वनिता गावंडे यांचे भाऊजी यांनी फर्निचर कामासाठी दिलेले दीड लाख रुपये  आणि त्याआधी घरभाड्याचे जमा झालेले ७८ हजार रुपये असे एकूण २ लाख २८ हजार रुपये घरात असलेल्या कपाटातील ड्रॉवरमध्ये लॉक लावून ठेवलेले होते. दरम्यान, ६ जून रोजी फर्निचरचे काम करणाऱ्यांना पैसे देण्याकरीता कपाटामध्ये पाहिले असता तिथे पैसे दिसले नाही. 

दोन संशयीत मुलींवर गुन्हा दाखल

कपाटात पैसे नसल्याचे कळताच वनिता गावंडे यांनी पती प्रमोद गावंडे यांना फोनकरून विचारपूस केली. त्यानंतर, दोघांनीही घरी आपल्या मुलांना विचारले तेव्हा, त्यांनी सांगितले की, मोठी मुलगी ट्युशनला जात असताना सायंकाळी ५ वाजता भाडेकरु दोन मूली घरामध्ये टिव्ही पाहण्यासाठी आल्या होत्या. घरी बहिणीचा मुलगा असल्याने त्याला एकीने घराबाहेर नेले होते. लहानी मुलगी घरामध्ये टीव्ही बघत होती. तेवढ्यात बहिणीच्या मुलाला कपाटाचाही आवाज आलेला होता. “तुला घड्याळ घेऊन देतो, आम्ही घरामध्ये आलो हे, तू तुझ्या मावशीला सांगू नको” असेही भाडेकरू मुलींनी त्याला सांगितले होते. यानंतर, त्या दोन्ही भाडेकरू मुलींना विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही, असे तक्रारीत नमूद आहे. यावरून पोलिसांनी संशयित दोन्ही मुलींवर गुन्हे दाखल केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top