dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल 

छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील वेरूळ परिसरात शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी वेरूळ येथे चक्का जाम केल्यानंतर 22 तासांनी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

शिवसेना नेते दानवे यांच्याकडून पोलिस गुन्हेगार मैत्रीचा आरोप 

छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यातील वेरूळ परिसरात शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी वेरूळ येथे चक्का जाम केल्यानंतर 22 तासांनी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मात्र यात आरोपीचे नावे न टाकता अज्ञात असा उल्लेख केल्याने शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी या प्रकरणात पोलीस आणि गुन्हेगार एकमेकांची मैत्री जपत असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे शिक्षकाला मारहाण केल्यानंतरचा व्हिडिओ समोर आल्यानंतरही आरोपी अज्ञात कसे ?   असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

वैजापूर पोलिस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी वेरूळ परिसरात एका आरोपीच्या शोधासाठी आणि फिर्यादी घटनास्थळी गेले होते. संबंधित फिर्यादी हा वाळू माफियाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून हे पथक आले होते. यावेळी रस्त्याने जाणारे शिक्षक सुरेश बोरसे यांनी “काय झाले?“ अशी साधी विचारणा केली. मात्र याच कारणावरून त्यांना मारहाण झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. 

याप्रकरणी पोलीस अधिकारी यांनी शिक्षकाला मारहाण करण्याचे आदेश दिल्याचा गंभीर आरोप होत असून त्यानंतर झालेल्या हल्ल्यात सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या प्रत्येक आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कायद्याचे रक्षण करणारेच जर कायदा हातात घेत असतील, तर राज्यातील नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे. 

अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा का ? 

मुळात वेरूळ येथील मृत शिक्षक सुरेश बोरसे यांना मारहाण करताना त्यांच्या कुटूंबियांनी काही हल्लेखोरांना पाहिले. त्याचे त्यांनी व्हिडिओ चित्रिकरण सुध्दा केले. त्यात त्यांच्या मुलीने हा एक नंबरचा आरोपी असे सांगत हल्लेखोराचा चेहरा दाखवला होता. दुसऱ्या हल्लेखोराचाही चेहरा तीने दाखवत त्याची ओळख सार्वजनिक करण्याचा प्रयत्न केला. यातील एक पोलिस कर्मचारी वैजापूर पोलिस ठाण्याचा कर्मचारी असल्याची चर्चा आहे. तर दुसरा हल्लेखोर हा एका खून प्रकरणातील आरोपी असल्यसाचा अरोप आमदार आंबादास दानवे यांनी केला आहे. असे असतांना पोलिसांनी आरोपी अज्ञात असल्याचा उल्लख का केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पोलिस गुन्हेगार एकाच फोटोत 

दरम्यान माजी विरोधी पक्षनेते आंबादास दानवे  यांनी पोष्ट करीत वेरूळ शिक्षक मृत्यम प्रकरणातील व्हिडिओ आणि फोटो अत्यंत धक्कादायक आहेत. शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी “हा एक नंबर“ म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे एक जबाबदार पोलीस गुन्हेगाराला पेढे भरवताना दिसत आहे. असल्याचे म्हटले आहे. गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर आहेत (त्यात एक पोलिसही स्पष्ट दिसतो आहे), घटनेच्या वेळी ते पोलिसांसोबत हजर आहेत, त्यांचे रेकॉर्ड पोलिसांना ठाऊक आहे; असं असताना काल खुलताबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी अनोळखी कसे काय असू शकतात ? हा गुन्हा नावानिशीच दाखल झाला पाहिजे अशी मागणी आ. दानवे यांनी अपल्या फेसबूक पोष्टमधून केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top