Three minor girls are missing: छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता

Three minor girls are missing

Three minor girls are missing: शहरातील विविध भागातील तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिसांनी गुन्हे दाखल करुन शोध सुरू केला आहे.

Three minor girls are missing
Three minor girls are missing

छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागातील तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिसांनी गुन्हे दाखल करुन शोध सुरू केला आहे.
पहिली तक्रार उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असून, फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या आणि त्यांचे पती कामावर गेल्यानंतर त्यांची 16 वर्षीय मुलगी कुणाला काहीही न सांगता घरुन निघून गेली. तिला कुणीतरी अज्ञाताने पळवून नेले असावे असा संशय असल्याचेही तक्रारीत नमुद आहे. प्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शोध सुरू केला आहे.
दुसरी तक्रार जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून, फिर्यादी पुरुषाने तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची 17 वर्षीय मुलगी त्यांच्या घरातून कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली. तिचा नातेवाईक आणि इतरत्र शोध घेतला असता मिळून आली नाही. याप्रकरणी 10 एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिलाई मशीनचा फॉर्म भरायला गेली अन् परतलीच नाही

तिसरी तक्रार सिडके पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची 17 वर्षीय मुलगी शिलाई मशीनचा फॉर्म भरुन येते असे म्हणून घरातून निघून गेली. परंतु आजपर्यंत ती परतलीच नाही. प्रकरणी तिला कुणीतरी फूस लावून पळवून नेले असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पुढील तपास सिडको पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »