dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पेट्रोलची बॉटल घेऊन विधवा महिला पोहोचली जीवन प्राधिकरण कार्यालयात ; पोलिसांनी पेट्रोल बॉटल केली जप्त

जालना :  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनासमोर एक विधवा महिला हातात पेट्रोलने भरलेली बॉटल घेऊन पोहोचल्यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी तत्परतेने ही बॉटल ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

जालना :  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनासमोर एक विधवा महिला हातात पेट्रोलने भरलेली बॉटल घेऊन पोहोचल्यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी तत्परतेने ही बॉटल ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

    जालना येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात मंगळवार, 15 एप्रिल रोजी दुपारी एक विधवा महिला हातात पेट्रोलची बॉटल घेऊन आत्मदहन करण्याच्या उद्देशाने दाखल झाली होती.  शिपाई पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे 16 महिन्यांपूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतरही फॅमिली पेन्शन लागू होत नसल्याने त्या शिपायाची विधवा पत्नी 16 महिन्यापासून कार्यालयातील चकरा मारत आहे. कार्यातील कार्यकारी अभियंता ए.एम.चव्हाण काम करून देण्यासाठी वारंवार टाळाटाळ करत असल्याने या महिलेने  आत्महत्या करण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात बॉटल भरून पेट्रोल आणले होते. पण या विधवा महिलने आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधीच तैनात असलेल्या पोलिसांनी महिलेच्या हातातून पेट्रोलची बॉटल हिसकावून घेतली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. रत्नमाला कऱ्हाळे असे या विधवा महिलेचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी महिलेवर कोणतीही कारवाई न करता समज देऊन तिची सुटका केली. यावेळी रत्नमाला कऱ्हाळे यांच्यासोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याने रत्नमाला कऱ्हाळे यांनी आत्महत्येचा विचार सोडला. यावेळी कदीम जालना पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top