dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

एसटी बसची दुचाकीला धडक; चालक गंभीर जखमी | करमाड शिवारात भीषण अपघात

करमाड :  छत्रपती संभाजीनगर – जालना महामार्गावर करमाड शिवारातील शिव पेट्रोलियम पंपासमोर भरधाव एसटी बसने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवार, २१ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडला. कारभारी शेख (५० वर्ष), रा. रोशनगाव, ता. बदनापूर, जि. जालना असे जखमीचे नाव आहे. 

अकोला ते छत्रपती संभाजीनगर ही एसटी बस क्रमांक (एमएच-१४-एलएक्स-८८३१) जालन्याहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होती. करमाड शिवारातील शिव पेट्रोल पंपाजवळ दुचाकी क्रमांक (एमएच-२१-एजी-३७०७) चालकाने अचानक दुभाजकातून वळण घेत असताना पाठीमागून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकीचालक कारभारी शेख उंच उडून रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून दुचाकीचा चक्काचूर झाला. धडकेनंतर बस दुभाजकावर जाऊन मधोमध अडकली होती, त्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top