खामगाव : आषाढी एकादशीचा उत्सव आटोपुन शेगावसाठी परतीच्या मार्गावर निघालेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे बुधवार 30 जुलै रोजी रजतनगरी खामगाव शहरामध्ये आगमन झाले. गण-गण-गणात बोतेच्या गजराने अवघ्ाी खामगाव नगरी दुमदुमुन गेली. श्रींच्या पालखीमुळे खामगाव शहरातमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. आवार येथील मुक्कामानंतर पालखीने पहाटे खामगाव शहराकडे प्रस्थान केले. सुरुवातीला टेंभुर्णा जवळ रस्त्याच्या दुतर्फा भाविका भक्तांनी श्रींच्या दर्शनाखाली अलोट गर्दी केली होती.

अनुप गवळी/ खामगाव : आषाढी एकादशीचा उत्सव आटोपुन शेगावसाठी परतीच्या मार्गावर निघालेल्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे बुधवार 30 जुलै रोजी रजतनगरी खामगाव शहरामध्ये आगमन झाले. गण-गण-गणात बोतेच्या गजराने अवघ्ाी खामगाव नगरी दुमदुमुन गेली. श्रींच्या पालखीमुळे खामगाव शहरातमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. आवार येथील मुक्कामानंतर पालखीने पहाटे खामगाव शहराकडे प्रस्थान केले. सुरुवातीला टेंभुर्णा जवळ रस्त्याच्या दुतर्फा भाविका भक्तांनी श्रींच्या दर्शनाखाली अलोट गर्दी केली होती. सकाळी 8.30 वाजता हनुमान व्हिटॅमीन येथे पालखीचे आगमन झाले. तेथे वारकऱ्यांसह भाविकांना चहा आणि जेवन देण्यात आले. या ठिकाणी काल्याच्या किर्तनाने यंदाच्या वारी सोहळ्याची सांगता झाली. वारकऱ्यांनी प्रसाद ग्रहण केल्यानंतर श्रींची पालखी खामगाव शहराकडे प्रस्थान झाली.
ठिकठिकाणी महाप्रसाद आणि फराळाचे वितरण
पंढरपूर येथून आषाढी एकादशीचा उत्सव आटोपून 30 जुलै रोजी खामगाव नगरीत आगमन प्रसंगी येथील टॉवर चौकात श्री गजानन भक्त मंडळाकडून 5 क्विंटल भाजी पोळी प्रसादाचे वितरण करण्यात आले. तसेच शहरातील बाळापूर नाका, चांदमारी चौक, कॉटन मार्केट, टिळक पुतळा, मेन रोड, फरशी सह ठिकठिकाणी वारीतील माऊली भक्तांना चहा, नाश्ता, फराळ आणि शरबतचे वितरण करण्यात आले.
आज श्रीं ची पालखी स्वगृही परतणार
30 जुलै रोजी खामगाव येथे मुक्कामानंतर श्रीं ची पालखी गुरूवार 31 जुलै रोजी पहाटे 5 वाजता येथील श्री. अ. खि. मंगल कार्यालयातून शेगावकडे प्रस्थान करणार आहे. खामगाव ते शेगाव पायदळ वारी करत श्रीं ची पालखी सकाळी 10 वाजता श्री. गजानन महाराज इंजिनिअरींग मध्ये पालखीचे आगमन होणार असून तेथून संपूर्ण शेगाव शहरात पालखीची नगर परिक्रमा होऊन नंतर श्रीं गजानन महाराज मंदिरात आगमनानंतर पाखली सोहळ्याचा समारोप होणार आहे.
