छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षापासून कंत्राटी पद्धतीच्या माध्यमातून श्रमिकांचे शोषण भांडवलदार आणि ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. येणारा काळ हा श्रमिमांच्या व पुढील युवा पिढीसाठी खूपच हालाकीचा असणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी 8 जून रोजी केले.

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षापासून कंत्राटी पद्धतीच्या माध्यमातून श्रमिकांचे शोषण भांडवलदार आणि ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. येणारा काळ हा श्रमिमांच्या व पुढील युवा पिढीसाठी खूपच हालाकीचा असणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांनी 8 जून रोजी केले. राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सभासद कामगारांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सभासद कामगारांचा मेळावा 8 जून रोजी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत भोसले यांच्यासह दत्तात्रय भालेराव यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना यशवंत भोसले पुढे म्हणाले की, मुठभर भांडवलदार आणि सरकारी अधिकारी वर्ग हा देशातील जनतेला ठेकेदारांच्या दावणीला बांधून गुलाम करतील. श्रमिकांनी संघटित होऊन श्रमिकाने आणि युवकांनी त्यास प्रतिकार केला पाहीजे. श्रमिकांच्या हक्कासाठी गेल्या 30 वर्षापासून आम्ही संघर्ष करुनही आमचे सरकार आणि आम्ही दोघेही हतबल झाले असल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले.
जागतिकिकरणात पूर्वेकडील देशांनी मानवतेचा धर्म जपला व देशातील नोकरदार वर्गाची आरोग्याची त्याच्या राहणीमानाची, त्याचे परिवाराची काळजी घेऊन त्यांच्या मानवी हक्काला तडा न देता जागतिक व्यवसाय स्पर्धेत अग्रनी सहभाग ठेवला. आमच्याकडे मात्र हेच उलट झाले या स्पर्धेत पुढे येण्यासाठी भारतीय नागरिकांना यंत्राच्या जागी ठेवण्यात आले, तेही कंत्राटी मद्दे असे चित्र आता तरी दिसत आहे. त्यामुळे त्याच्यातील माणूस संपला आहे. हे चित्र बदलावे लागणार असल्यानें संघटित व्हा आपले अधिकार मागून घ्या असे आवाहन दत्तात्रय भालेराव यांनी यावेळी केले. तसेच संविधान हा आपला ग्रंथ आहे त्याचे जतन आपले केंद्रातील व राज्यातील सरकार करत आहे त्या बरोबर आपणासही ते जतन करावे लागणार असल्रूाचे त्यांनी सांगितले.