dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

संतापजनक! मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा छळ ; बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

मोताळा  : मुलगी जन्माला आली म्हणून एका विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. 

मोताळा  : मुलगी जन्माला आली म्हणून एका विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. 

पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा विवाह समाजाच्या रितीरिवाजानुसार नांदुरा तालुक्यातील एका गावातील  तरुणाशी झाला.   सुरुवातीला काही काळ चांगले संबंध होते.  पिडीतिने मुलीला जन्म दिल्यावर तिच्यावर मानसिक व शारीरिक अत्याचार सुरू  झाला. “तू दिसायला चांगली नाहीस”, “तुला स्वयंपाक येत नाही”, असे म्हणत पतीने तिच्याविरुद्ध  अपमानकारक वक्तव्य केले. याशिवाय, नातेवाईकांनीही तिला त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. पतीला भडकून देण्यात  काही नातेवाईकांचा  सहभाग असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पतीने व्यवसाय व घराच्या बांधकामासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करत मारहाण केली, तसेच पैसे न आणल्यास माहेरीच राहण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. पीडित विवाहितेच्या  तक्रारीवरून  ८ जून रोजी बोराखेडी पोलिसांनी सात जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top