The absconding accused in the murder: खुनातील फरार आरोपी २१ वर्षांनी अडकला पोलिसांच्या जाळ्यात

The absconding accused in the murder

The absconding accused in the murder: अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना २००३ मध्ये संचित रजेवर कारागृहातून बाहेर पडल्यानंतर नारायण गायकवाड खूनातील आरोपी फरार होता. तब्बल २१ वर्षांनी अर्थात रविवार ७ एप्रिल रोजी बोराखेडी पोलिसांनी त्यास जळगाव जिल्ह्यातील रुईखेडा (ता.मुक्ताईनगर) येथून अटक केली.

The absconding accused in the murder
The absconding accused in the murder

मोताळा (जि. बुलढाणा): तालुक्यातील बोराखेडी येथे घरगुती कारणावरुन झालेल्या वादातून अनिल मोरे याने सशस्त्र हल्ला करून मामा नारायण गायकवाड यांचा खून केल्याची घटना १८ सप्टेंबर २००० रोजी घडली होती. या प्रकरणी अनिल मोरे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना २००३ मध्ये संचित रजेवर कारागृहातून बाहेर पडल्यानंतर तो फरार होता. तब्बल २१ वर्षांनी अर्थात रविवार ७ एप्रिल रोजी बोराखेडी पोलिसांनी त्यास जळगाव जिल्ह्यातील रुईखेडा (ता.मुक्ताईनगर) येथून अटक केली.

बोराखेडी पोलिस हद्दीत असलेल्या बोराखेडी येथे 18 सप्टेंबर 2000 घरगुती कारणाच्या वादातून अनिल प्रल्हाद मोरे याने वाद सोडविण्यासाठी गेलेल्या नारायण पुंजाजी गायकवाड यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन धारदार शस्त्राने त्यांच्या छातीत वार करुन खून केला होता. या प्रकरणी न्यायालय सेशन कोर्ट बुलढाणा यांनी आरोपी अनिल प्रल्हाद मोरे याला जन्मठेपची शिक्षा ठोठावली होती. तो मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे शिक्षा भोगत असतांना तो 2003 मध्ये संचित रजेवर बोराखेडी येथे आला होता. रजा संपल्यानंतर तो परत कारागृहात हजर झालाच नाही. त्यामुळे बोराखेडी येथे मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे हवालदार विनोद लोहकरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल २१ वर्षानंतर फरार आरोपीचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत दोन ते तीन दिवस रुईखेडा ता.मुक्ताईनगर येथे थांबून माहिती काढली असता, आरोपी त्याचे नाव बदलून राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पोलिसांनी आरोपी अनिल मोरे याच्या  मुसक्या आवळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »