Student commits suicide by throwing uri in front of train in Jalna : जालना येथे रेल्वे समोर ऊडी घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

Student commits suicide by throwing uri in front of train in Jalna : रेल्वे स्थानक परिसरात प्लेटफाॕर्मवर पुर्व दिशेला नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवार, 24 रविवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. 

जालना : रेल्वे स्थानक परिसरात प्लेटफाॕर्मवर पुर्व दिशेला नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या तपोवन एक्सप्रेस रेल्वेसमोर उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवार, 24 रविवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही पाय आणि डोक्यावर जबर मार लागल्याने युवक जागीच ठार झाला. आशिष सर्जेराव माघाडे (18 ) रा.पाथ्रुड ता. जालना,  असे मयत युवकाचे नाव आहे.  

 जालना येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या क्वाॕटरला मामाकडे रहायला असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली. हा विद्यार्थी 12 वी ला शिक्षण घेत होता. आॕनलाईन परिक्षेचा फाॕर्म भरण्यासाठी दुचाकीवरून घरातून गेला होता. परंतू रेल्वे रुळावर त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट असून पोलीस तपासात ते स्पष्ट होईल.

दरम्यान घटनेची माहिती कळताच रेल्वे पोलीसांनी घटनेच्या पंचनामा करून युवकास तात्काळ जिल्हा सामान्य शासकीय रूग्णालयात हलवले. डाॕक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »