आयसीएफऐवजी एलएचबी कोचेस;’इंटरसिटी’चा प्रवास होणार आरामदायी

वाशिम :दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेत व गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने काचीगुडा इंटरसिटी एक्सप्रेस गाड्यांच्या कोच संरचनेत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सदर गाड्यांमधील पारंपरिक आयसीएफ कोचेस ऐवजी आधुनिक एलएचबी कोचेस वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

यानुसार,  गाडी क्रमांक १७६४१ काचीगुडा–नरखेड इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी काचीगुडा येथून ४ जानेवारी २०२६ पासून, तर  गाडी क्रमांक १७६४२ नरखेड–काचीगुडा इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी नरखेड येथून ५ जानेवारी २०२६ पासून एलएचबी कोचेससह धावणार आहे. तसेच, गाडी क्रमांक १७६३९ काचीगुडा–अकोला इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी काचीगुडा येथून ५ जानेवारी २०२६ पासून, गाडी क्रमांक १७६४० अकोला–काचीगुडा इंटरसिटी एक्सप्रेस ही गाडी अकोला येथून ६ जानेवारी २०२६ पासून एलएचबी कोचेससह चालविण्यात येणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार असून, इंटरसिटी प्रवासाचा दर्जा लक्षणीयरीत्या उंचावणार आहे. एलएचबी कोचेसच्या वापरामुळे काचीगुडा–नरखेड व काचीगुडा–अकोला मार्गावरील प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

एलएचबी कोच म्हणजे काय?  

एलएचबी  कोच हे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक रेल्वे डबे आहेत. आयसीएफ कोचेसच्या तुलनेत हे कोच अधिक सुरक्षित असून अपघाताच्या वेळी एकमेकांवर चढत नाहीत. प्रवासादरम्यान कमी कंपन, कमी आवाज आणि अधिक आराम मिळतो. आधुनिक एलएचबी कोचेसमुळे गाडीचा कमाल वेग ताशी १६० किमीपर्यंत शक्य होतो.  देखभाल खर्च कमी असून प्रवाशांसाठी स्वच्छता व सुविधा अधिक चांगल्या असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »