dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भेसळयुक्त खाद्यतेल, गुटखा व लेबल दोषयुक्त पेयांचा साठा जप्त

अंबड (जि.जालना) : अन्न व औषध प्रशासन विभागाने जालना जिल्ह्यात अन्नसुरक्षा व ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत भेसळयुक्त खाद्यतेल, प्रतिबंधित गुटखा तसेच लेबलदोषयुक्त ऊर्जा पेयांचा एकूण सुमारे ३ लाख ९५ हजार ५९९ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

अन्न व औषध प्रशासनाची जालना जिल्ह्यात कारवाई

अंबड (जि.जालना) : अन्न व औषध प्रशासन विभागाने जालना जिल्ह्यात अन्नसुरक्षा व ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत भेसळयुक्त खाद्यतेल, प्रतिबंधित गुटखा तसेच लेबलदोषयुक्त ऊर्जा पेयांचा एकूण सुमारे ३ लाख ९५ हजार ५९९ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नि. सु. कुलकर्णी यांनी दिली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने अंबड येथील भगवती ट्रेडर्स या आस्थापनावर तपासणी करण्यात आली. यावेळी भेसळयुक्त असल्याचा संशय असलेल्या खाद्यतेलाचा साठा आढळून आला. संबंधित तेलाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ३५८ किलो वजनाचा व ५७ हजार २८० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. दुसरी कारवाई अंबड तालुक्यातील शहागड येथील रहिम रहमान शेख याच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. या प्रकरणात गुटखा व वाहने असा एकूण २ लाख १९ हजार ७१९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top