छत्रपती संभाजीनगर : दुचाकी वाहनांचे सीट तयार करणाऱ्या अमोदी कुशन शॉप या दुकानाला आग लागून लाखो रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाले. दुकानाला आग लागल्याची घटना शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली. तसेच दुकानाला आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

टीव्ही सेाटर परिसरातील ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अमोदी कुशन शॉप नावाचे दुचाकी वाहनांचे सीट तयार करण्याचे दुकान आहे. शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुकानातून धुर येत असल्याचा प्रकार जवळपास राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी या घटनेची माहिती दुकान मालकाला आणि अग्निशमन दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उपअग्निशमन अधिकारी व्ही.बी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डयुटी अधिकारी हरिश्चंद्र पवार, अग्निशमन दलाचे जवान अशोक पोटे, तनवीर शेख, विक्रम भुईगळ, गजानन गावंदे, शिवाजी काकडे, वाहनचालक शंकर दुधे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास तासभर आगीशी झुंज देत आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत दुकानातील फर्निचर, दुचाकी वाहनांचे सीट कव्हर, सीटचे फोम, सीट बनविण्यासाठी लागणारे फायबर, केमीकल आदी जळून खाक झाले. दुकानाला लागलेल्या या आगीत जवळपास लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.