मोताळा: टिप्परवर पाठीमागून स्कुटी धडकल्याने झालेल्या अपघातात येथील एका ३२ वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना १५ जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान वाघजाळ फाट्यावर घडली.

मोताळा: टिप्परवर पाठीमागून स्कुटी धडकल्याने झालेल्या अपघातात येथील एका ३२ वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना १५ जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान वाघजाळ फाट्यावर घडली.
याबाबत घटनास्थळावर उपस्थित नागरिकांकडून मिळालेल्या महितीनुसार, एम.एच.२८- ६७९९ क्रमांकाचे टिप्पर मालवाहू वाहन बुलढाण्याकडून मोताळाकडे येत होते. दरम्यान वाघजाळ फाट्यावर टिप्पर चालकाने गतिरोधकावर वेग कमी केला. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या दर्शन सुनील जैन यांची एम. एच. २८-ए. एक्स. ४७६२ क्रमांकाची स्कुटी टिप्परवर पाठीमागून आदळली. धडक एवढी जोराची होती की, दर्शन जैन गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दर्शन जैन यांचा जनरल स्टोअर्सचा व्यवसाय होता. तसेच ते पत्रकार सुद्धा होते. नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. या घटनेमुळे जैन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.