dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

रिसोडमध्ये जुन्या वादातून थरार; झोपेत असताना तरुणाची दगड घालून हत्या

रिसोड  : शहरातील हिंगोली मार्गावरील माणुसकी नगर भागात जुन्या वादातून एका ३८ वर्षीय तरुणाची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, रिसोड पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

​भगवान सुभाष गायकवाड (वय ३८) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, घटना १५ जून रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास घडली. भगवान गायकवाड हे माणुसकी नगर येथील राहत्या घरी झोपलेले होते. दरम्यान, जुन्या वादाचा राग मनात धरून आलेल्या आरोपीने, मृतक झोपेत असतानाच त्यांच्या डोक्यावर मोठा दगड किंवा लोखंडी रॉडने जबर प्रहार केला. हा हल्ला इतका भीषण होता की, भगवान गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

​याप्रकरणी रिसोड पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे माणुसकी नगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top