dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

महसूल गेटवरील सीसी कॅमेऱ्याला ‘बेशरमीचा हार’ :  अवैध रेती वाहतुकीविरोधात युवासेनेचा अनोखा निषेध

अंढेरा :   खडकपूर्णा धरण परिसरातून होत असल्याचा आरोप असलेल्या अवैध रेती वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर मंडपगाव येथील महसूल गेटवर बसविण्यात आलेल्या सीसी कॅमेरा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत युवासेना जिल्हाध्यक्ष संतोष भुतेकर व सामाजिक कार्यकर्ते सचिन कदम यांनी सोमवारी अनोखे आंदोलन केले. महसूल गेटवरील सीसी कॅमेऱ्याला बेशरमीच्या पानाफुलांचा हार घालून  संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

खडकपूर्णा धरण परिसरातून अवैध रेती उपसा व वाहतुकीबाबत सातत्याने तक्रारी होत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाच्या वतीने महसूल गेटवर सीसी कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, कॅमेरे कार्यरत असतानाही अवैध वाहतूक रोखण्यात अपेक्षित यश प्रशासनाला मिळाले नाही.

“वाहनांची ये-जा, रेती वाहतुकीचे मार्ग आणि विविध हालचाली सीसी कॅमेऱ्यामध्ये नोंदवल्या जात असताना संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हे कॅमेरे केवळ औपचारिकता ठरत आहेत का?” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या यंत्रणांचा उद्देश अवैध प्रकारांना आळा घालणे हा आहे. मात्र, स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असतानाही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने जनतेत नाराजी वाढत आहे.

यावेळी सचिन कदम यांनी संबंधित कालावधीतील सीसी कॅमेरा फुटेजची तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी केली. तसेच अवैध रेती वाहतुकीबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले.

आंदोलनकर्त्यांनी या प्रकरणात महसूल, पोलीस व खनिकर्म विभागाने समन्वयाने काम करून अवैध रेती उपसा व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी मागणी केली. अन्यथा यापुढे तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top