dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

काँग्रेसचे 9 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेसोबत; शिंदे शिवसेना गटाला धक्का

मेहकर : मेहकरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप  झाला असून काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे नगरपालिकेत महाविकास आघाडीच्या संख्याबळामुळे बहुमत  झाले असल्याने विरोधी असलेल्या शिंदे शिवसेना गटाच्या हातातून सत्ता आणि प्रभाव दोन्ही निसटल्याची चर्चा रंगली आहे.

   एकेकाळी शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानला जाणारा मेहकर विधानसभा मतदारसंघ आमदार सिद्धार्थ खरात यांच्या ऐतिहासिक विजयाने हादरला होता. तब्बल चार दशकांपासून रुजलेली राजकीय मक्तेदारी मोडीत काढत ठाकरे शिवसेनेने विधानसभा जिंकली आणि त्यानंतर नगरपरिषदेतही सत्ता हस्तगत केली. आता काँग्रेसच्या 9 नगरसेवकांनी दिलेल्या अधिकृत पाठिंब्यामुळे या राजकीय परिवर्तनावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे मिळून 16 सदस्यांचे स्पष्ट बहुमत झाल्याने नगरपालिकेतील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. विरोधात असलेल्या शिंदे गटांसाठी हा धक्का केवळ संख्याबळाचा नसून त्यांच्या भविष्यातील राजकीय अस्तित्वालाच मोठे आव्हान मानला जात आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

 कमिटीचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी 9 नगरसेवकांच्या स्वाक्षरीयुक्त समर्थनपत्रासह नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला. 

या नगर सेवकांनी दिला पाठिंबा

पत्रकार परिषदेत गटनेते मोहम्मद अलीम मोहम्मद ताहेर, मंगला सुरेश मानवतकर, मुजीब हसन अब्दुल हबीब कुरेशी, मुजीब खानवली महम्मद खान पठाण, अंजुम बानो शेख अख्तर कुरेशी, शबनूर बी शेख रईस कुरेशी, सुनीता संजय ढाकरके, वैभव उमाळकर, नीलिमा शरद सोमण यांनी  नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना पाठिंबा दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top