dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले: राष्ट्रवादी- शिवसेनेनंतर काँग्रेसचा रास्ता रोको  

छत्रपती संभाजीनगर :  राज्य सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी आणि अन्य प्रश्नावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच गोचीत पकडले आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आ. रोहित पवार यांनी उपोषण सुरू केल्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षानेही मराठवाडाव्यापी बळीराजा गर्जना टँक्टर रॅलीची हाक दिली आहे. मात्र सेनेच्या आज होणाऱ्या आंदोलनापूवच काँग्रेसच्या वतीने खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात सोमवार, 15 जून रोजी छत्रपती संभाजीनगर – जालना जिल्ह्याची सीमा असलेल्या केंब्रीज चौकात सरकारविरूध्द रास्ता रोको करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. 

छत्रपती संभाजीनगर :  राज्य सरकारने केलेली शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी आणि अन्य प्रश्नावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच गोचीत पकडले आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आ. रोहित पवार यांनी उपोषण सुरू केल्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्षानेही मराठवाडाव्यापी बळीराजा गर्जना टँक्टर रॅलीची हाक दिली आहे. मात्र सेनेच्या आज होणाऱ्या आंदोलनापूवच काँग्रेसच्या वतीने खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात सोमवार, 15 जून रोजी छत्रपती संभाजीनगर – जालना जिल्ह्याची सीमा असलेल्या केंब्रीज चौकात सरकारविरूध्द रास्ता रोको करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळीच काँग्रेसने अचानक केलेल्या आंदोलनामुळे शहरात येणाऱ्या आणि जालना, जळगांव, बीडकडे जाणाऱ्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.  

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने ऐन गदच्या वेळी केंब्रिज चौकात ठिय्या मांडला. जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ हा मुख्य महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आणि जालना रोडवर वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खा.डॉ. काळे यांना ताब्यात घेतले, ज्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू झाले.

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांच्ाी दोन लाखा पर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे करीत असतांना त्यात जाचक अटी टाकल्याचा आरोप विरोधक, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. नेमक्या या अटी दूर करून शेतकऱ्यांना सरसगट दोन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात यावी, रासायनिक खाची ऑनलाईन नोंदणी आणि विक्री थांबविण्यात यावी या मागण्यांसाठी चार दिवसापासून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आ. रोहित पवार उपोषण करीत आहेत. दुसरीकडे रविवारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना मराठवाडाभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढणार असलीयाची घोषणा केली. मंगळवार, 16 जून रोजी शिवसेनेचे आंदोलन होत आहे. त्यापूवच सोमवार, 15 जून सकाळी काँग्रेसने जालना जिल्ह्याचे खा. डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वात अचानक जालना रोडवरील केंब्रीज चौकात याच दोन मागण्यांसाठी रास्तो रोके केला. अचानक झालेल्या या आंदांलनामुळे प्रशानाची दमछाक झाली तर जालना, जळगांव, बीडकडे जाणाऱ्या वाहनांच्या 5 ते 7 कि.मी. लांब रांगा लागल्या. 

अर्ध्या तासानंतर खा.डॉ. काळे ताब्यात 

या आंदोलनात छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील शेतकरी, काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. त्यांनी शेतकरी रडतोय… शासन झोपलंय ! अशा घोषणांचे फलक दाखवले. सकाळची वेळ आणि वाहनांची मोठी गद होत असल्याने शहराच्या प्रमुख मार्गावर चक्का जाम झाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे हे आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी पोलिसांनी रास्तो रोकेचे नेतृत्व करणाऱ्या खा. डॉ. कल्याण काळे यांना अर्ध्या तासानंतर ताब्यात घेतले. 

शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरू 

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या  राज्य  सरकारविरूध्द हे आंदोलन केवळ सुरुवात आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि ऑनलाईन खतविक्रीचे जाचक ॲप बंद केले नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे दुसरे मोठे आंदोलन उभे करून रस्त्यावर उतरू. 

  – खा. डॉ. कल्याण काळे, काँग्रेस

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top