मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळले; कुटुंब उघड्यावर

जाफ्राबाद :  मुसळधार पावसामुळे घराचे छत कोसळल्याची घटना शुक्रवार, 19 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास जाफ्राबाद तालुक्यातील खामखेडा गावात घडली. पावसामुळे छत कोसळण्याचा आवाज आल्यामुळे घरातील सदस्यांनी बाहेर धाव घेतल्याने कोणतीही जीवित हानी या घटनेत झाली नाही.

जाफ्राबाद तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे खामखेडा येथील रहिवासी दमोता आण्णा फदाट यांच्या राहत्या घराचे छत रात्री नऊ वाजेच्या सुमारास कोसळले. जोरदार पावसामुळे घराचे छत कोसळत असल्याचे निदर्शनास आल्यावर फदाट कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेवून आपला जीव वाचवला. या घटनेत घरातील संसारउपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले. तर दमोता फदाट यांचया घराजवळच राहणारे प्रकाश भटकर यांनी फदाट यांच्या घराच्या भिंतीलगत शेड बांधून त्यात शेळ्या बांधत होते. परंतु फदाट यांच्या घराचे छत कोसळले त्यावेळी भटकर यांच्या शेळ्या शेडमध्ये नसल्याने त्या बचावल्या. या घटनेत दमोता फदाट यांचे कुटुंबिय उघड्यावर पडले असून शासनाने त्वरित त्यांचा घराचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »