वाशिम : पंढरपूरवरून अमरावतीकडे निघालेल्या एसटी बसचा आज (२० सप्टेंबर) सकाळी कळंबा महाली गावाजवळ गंभीर अपघात झाला. सकाळी साधारण आठच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

वाशिम : पंढरपूरवरून अमरावतीकडे निघालेल्या एसटी बसचा आज (२० सप्टेंबर) सकाळी कळंबा महाली गावाजवळ गंभीर अपघात झाला. सकाळी साधारण आठच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा टायर पंक्चर झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या एसटी बसने ट्रकला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की बसमधील प्रवासी जखमी होऊन रस्त्यावर एकच गोंधळ उडाला.
जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात खळबळ माजली असून पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.