जालना : येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी नऊ जुगार्यांना पकडले असून त्यांच्याकडून साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आयडीसीतील जुगार अड्ड्यावर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी गुरुवार, 18 जून रोजी ही कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहायक फौजदार मनसुब वेताळ, पोहेकाँ. प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, राजेंद्र पवार, अभिजीत वायकोस यांनी ही कारवाई केली.
अवैध धंद्यांना अभय
जालना शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहे. याबाबत काही दिवसांपुर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले होते. जिल्ह्यात सर्रासपणे अवैध धंदे सुरू असूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. काँग्रेसच्या कामगार विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण देखील केले होते.