धावडा : जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान, वालसावंगी येथील शेतकरी देवाजी पवार यांच्या वाढोना शिवारात असलेल्या गोठ्यावर वीज कोसळली. यात काही कोंबड्या दगावल्या आहेत.

धावडा : जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान, वालसावंगी येथील शेतकरी देवाजी पवार यांच्या वाढोना शिवारात असलेल्या गोठ्यावर वीज कोसळली. यात काही कोंबड्या दगावल्या आहेत. गोठ्यातील गाय, शेळ्या, कोंबड्या होरपळून जखमी झाल्या तर गोठ्याचे मोठे नुकसान झाले. बुधवारी रात्री झालेली वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या वेळी वीज कोसळली. यामुळे आग लागून गोठ्याचे नुकसान झाले.

गोठ्यावर वीज कोसळली तेव्हा गोठ्याला आग लागली. यात गुरांसाठी भरलेली २५ ट्रॉली चाऱ्याची कुट्टी, दूध काढण्याची मशीन, प्रेशर मशीन, झटका मशीन व त्याची बॅटरी चार्जिंग पंप, तुषार संच, पीव्हीसी पाईप, एक हजार लिटरची पाण्याची टाकी, १० पोते सरकी ढेप, १५ पोते सुग्रास असे साहित्य जळून खाक झाले. दोन शेळ्या, एक गाय किरकोळ होरपळले असून काही कोंबड्या दगावल्या. दरम्यान, झालेल्या नुकसानीचा तलाठ्यांनी पंचनामा केला असून शेतकऱ्याला नुकसाभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.