बुलढाणा : कारले म्हटले म्हणजे कडवट पणा आलाच. मात्र हेच कडू कारले आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे आहे. आरोग्यासाठी अत्यंत हितावह असलेल्या कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केल्या जातो. त्यामुळे कारल्याला बाजारात चांगला भाव देखील मिळत असतो. गत सहा वर्षांपासून कारले लागवडीच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेणाऱ्या डोंगर शेवली येथील युवा शेतकरी विनोद डिगांबर सावळे यांच्या जीवनात गोडवा आणला आहे.

चिखली तालुक्यातील डोंगर शेवली येथील युवा शेतकरी विनोद सावळे यांच्याकडे वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. याच शेतीत वडिल डिगांबर सावळे यांच्या मार्गदर्शनात विनोद नवनवीन प्रयोग राबवून भरघोस उत्पादन घेत आहेत. गत सहा वर्षापूर्वी त्यांनी एक एकर शेतात संकरीत वाण असलेले कारले लागवड करण्यास सुरुवात केली. यासाठी मंडप उभारणी करून त्यामध्ये सरी वरंब्यावर कारल्याची लागवड आणि ड्रीप (ठिंबक) द्वारे सिंचन सोबतच औषधी, खते सोडले. कारले लागवड ते तोडणी व विक्री असा खर्च वजा करता वर्षाकाठी लाखोचे उत्पादन घेण्याची किमया करणाऱ्या या युवा शेतकऱ्याने कारल्यासोबतच टोमॅटो, वांगे व काकडी या भाजीपाला पिकांची देखील अर्ध्या एकर क्षेत्रावर लागवड करून भाजीपाला व्यवसायात एक पाऊल टाकीत आणखी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवले आहेत.
30 ते 40 रुपये मिळतो भाव
कारले चावीला कडू असले, तरी आरोग्यवर्धक असल्याने नागरिकांकडून स्वयंपाकात फळभाजीसाठी मोठ्या प्रमाणावर कारले खरेदी केल्या जाते. बाजारात कारले 30 ते 40 रुपये भावाने विक्री होत असून, देखील कारल्याला चांगली मागणी असते.
पारंपरिक शेती सोबतच शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतीकडे वळले पाहिजे. आजरोजी मी जेव्हापासून कारले व भाजीपाल्याची शेती करू लागलो. तेव्हापासून उत्पादनात वाढ तरच झालीच, पर्यांयाने जीवनात समृद्धी आली आहे.
– विनोद सावळे, शेतकरी डोंगर शेवली