dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

आता  ‘कॉकरोच जनता पार्टी’चा पुण्यात एल्गार! 11 जूनला करणार आंदोलन

पुणे :  आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ पुण्यात एल्गार पुकारणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 11 जून रोजी पुण्यात आंदोलनाची घोषणा केली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. 

पुणे :  आता ‘कॉकरोच जनता पार्टी’ पुण्यात एल्गार पुकारणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी 11 जून रोजी पुण्यात आंदोलनाची घोषणा केली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. 

दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत ‘कॉकरोच जनता पार्टी’ आहे. देशातील स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक व्यवस्थेतील कथित अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थी व युवक त्रस्त आहेत. विशेषतः नीट परीक्षा, सीबीएसई निकालांशी संबंधित वाद आणि विविध भरती प्रक्रियांतील कथित त्रुटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी दिल्लीनंतर आता पुण्यात कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करणार आहे.  6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने पहिले मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली होती. आंदोलनात शेकडो विद्यार्थी, युवक आणि पालक सहभागी झाले होते. अनेक आंदोलकांनी कॉकरोचचे मुखवटे घालून निषेध नोंदवला होता. आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडले आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली. आता सर्वांचे लक्ष पुण्यातील आंदोलनाकडे लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top