dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

L

बुलढाणा :   आ. गायकवाड यांनी वकील असीम सरोदे यांच्या नावावरून “अर्धे हिंदुस्तानी आणि अर्धे पाकिस्तानी असे पाहिले असल्याचा वादग्रस्त उल्लेख केला. यावर आता, ॲड. सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली असून, “आ. गायकवाडांची बुद्धिमत्ता विकसित झालेली नाही, “असे दिसत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

बुलढाणा :  ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्यामार्फत भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी  आमदार संजय गायकवाड यांना एका प्रकरणावरून  १०० कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी, आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करत असताना आ. गायकवाड यांनी वकील असीम सरोदे यांच्या नावावरून “अर्धे हिंदुस्तानी आणि अर्धे पाकिस्तानी असे पाहिले असल्याचा वादग्रस्त उल्लेख केला. यावर आता, ॲड. सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली असून, “आ. गायकवाडांची बुद्धिमत्ता विकसित झालेली नाही, “असे दिसत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

ॲड. असीम सरोदे म्हणाले की, “आ. संजय गायकवाड यांनी केलेले वक्तव्य माझी बदनामी करणारे आहे. असे अनावश्यक वक्तव्य करणे त्यांनी टाळले पाहिजे, परंतु त्यांची भाषा, वागणूक बेकायदेशीर का आहे? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. आपल्या असीम या नावाविषयी सांगताना ॲड. सरोदे यांनी   आमदार गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. आ. गायकवाड यांचा संस्कृत आणि संस्कृतीशी फार संबंध नसेल, किंवा पुतळे लावणे म्हणजेच देशभक्ती त्यांना वाटत असावी. संस्कृत भाषेनुसार, असीम या नावाचा अर्थ ज्याला सीमा नाही असा होतो. नावावरून केलेले हे वक्तव्य, अत्यंत चुकीचे  असून त्यांनी असे वक्तव्य करणे टाळावे, असे. ॲड. असीम सरोदे म्हणाले. नोटीशी वरून सुरू झालेल्या या प्रकरणात आता वाद रंगला असून, कायदेशीर रित्या याला काय वळण मिळते? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top