dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अपंग मेंढपाळाला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण

अंढेरा : ईसरूळ  शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेंढ्यांचा मुक्काम शेतात घालण्यासाठी आलेल्या एका अपंग मेंढपाळावर क्षुल्लक कारणावरून निर्दयपणे हल्ला केल्याची धक्कादायक घटना इसरूळ शिवारात घडली असून, या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंढेरा : ईसरूळ  शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेंढ्यांचा मुक्काम शेतात घालण्यासाठी आलेल्या एका अपंग मेंढपाळावर क्षुल्लक कारणावरून निर्दयपणे हल्ला केल्याची धक्कादायक घटना इसरूळ शिवारात घडली असून, या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव रामराव काळे (वय 58, रा. इसरूळ, ता. चिखली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनोद रामदास खांबट (रा. इसरूळ) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 351(2) व 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना 5 जून रोजी रात्री सुमारे 10 ते 10.30 वाजण्याच्या दरम्यान इसरूळ शिवारातील शेख मन्नू शेख दादू यांच्या शेतात घडली. संबंधित शेतात मेंढ्यांचा मुक्काम सुरू असताना मटणाची भाजी तयार केली जात होती. त्यावेळी भाजी सांडल्याच्या कारणावरून आरोपीने जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी भीमराव काळे यांच्यावर लाकडी काठीने मान, पाठ आणि दोन्ही पायांवर बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मारहाणीत जखमी झालेल्या भीमराव काळे यांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी रेफर केल्याने त्यांनी बुलढाणा येथे उपचार घेतले. उपचारानंतर 11 जून रोजी सायंकाळी अंढेरा पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, मेंढपाळ शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्यांचा मुक्काम करून नैसर्गिक खत पुरवतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. अशा परिस्थितीत एका अपंग मेंढपाळावर झालेली ही मारहाण मानवतेलाच काळिमा फासणारी असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. कायद्याचा धाक कमी झाला आहे का, असा सवालही या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.    पुढील तपास  पोलीस हवालदार गणेश देढे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top