Manoj Jarange Patil on strike: सरकारने मराठा समाजाला धोका दिल्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil on strike : आरक्षणावर आम्ही ठाम आहोत. सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी जरांगे पाटील यांनी करत शनिवार 20 जुलैपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

अंतरवाली सराटी (जालना) : आरक्षणावर आम्ही ठाम आहोत. सरकारने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी जरांगे पाटील यांनी करत शनिवार 20 जुलैपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटीमध्ये शनिवारपासून त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. राज्य सरकारने अजूनही सरसकट आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही, म्हणून पुन्हा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने मराठा समाजाला धोका दिल्यामुळे पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची वेळ आली. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात. सरकारला मागण्या माहीत आहेत. त्याच त्या मागण्या पुन्हा सांगण्याची गरज नाही. नोंदी शोधल्या जात नाहीत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. हैदराबादहून आणलेले पुरावे पहावेत. आता बहाणे नको, तुम्हाला खूप वेळ दिला. नोकर भरती, शाळेच्या प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. एसईबीसी- ईडब्ल्यूएस- कुणबी प्रमाणपत्रे अडचणी येत आहेत. ते लागू करीत नाहीत. तसेच, ‘प्रत्येक वेळी सरकार वेगवेगळे निर्णय घेते. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तिन्ही पर्याय ठेवा नाहीतर ते ओपनमध्ये अर्ज करतील. विद्यार्थ्यांना नोकर भरतीमध्ये मराठा मुलांना प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत द्या. मुलींना शिक्षण मोफत केले पण ते दिले जात नाही. केजी टू पीजी मुलींना मोफत शिक्षण केले पण ते व्यवस्थित केले नाही. सरकारला जितका वेळ पाहिजे होता तो दिला. सगे सोयरेबाबत निर्णय घ्या. काय हरकती आहेत ते तुम्ही पाहा. सरकारचा शब्द आहे. आम्ही मागणी बदलली नाही असे त्यांनी सांगितले.
वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांच्याबदद्दल बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, ‘हिंगोलीतील पोलिस भरतीत कुणबी प्रमाणपत्र असताना पोलिसांनी ओपनमध्ये अर्ज कर म्हणून लिहून घेतले. सगळी कागदपत्रे असताना संमतीपत्र पोलिसांनी लिहून घेतले. काही जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याकडून चाळे सुरू आहेत. बोगस कागदपत्रे करून आयएएस करता आणि खरे कागदपत्रे असताना आमच्यावर अन्याय करता असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

सगळ्या परीक्षेत प्रवेशात सरकार आमच्यावर अन्याय का करत आहे? तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचे नाही, धनगरांना आरक्षण द्यायचे नाही, मुस्लिमांना आरक्षण द्यायचे नाही. तुम्हाला यांना न्याय द्यायचा नाही आणि लाडका भाऊ- लाडकी बहीण आणायचे आहे असे म्हणत सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर जरांगे पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, ‘आरक्षण मुद्दा सोडून नव्या योजना आणून सरकारने लोकांना वेगळ्या विषयात गुंतवून ठेवले आहे. लाडकी बहीण -लाडका भाऊ आता लाडकी मेहुणी आणि मेहुणा आणतील. तुमच्या लाडक्या बहीण- भाऊ योजानेमुळे साइट बंद पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अॅडमिशन होत नाही. वेबसाइट लोड होत नाही. सरकार डाव टाकत आहे. सरकार खूप चालू आहे. आता लाडका मेहुणीची तयारी सुरू केली आहे. तोपर्यंत आचारसंहिता लागेल आणि सर्वकाही बंद होईल अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विविध योजनांवर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »