न्यायालयाने परवानगी नाकारली; तरीही आम्ही मुंबईत जाणारच: मनोज जरांगे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

जालना :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू करणार आहेत. मात्र, मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना परवानगी नाकारली आहे. दरम्यान, आपण न्यायदेवेतचा आदर करतो,पण आम्ही मुंबईत जाणारच आहोत. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. 

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी क्रांतीदिनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. त्यानुसार बुधवार, 27 ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराटी ( ता. अंबड ) येथून सकाळी 10 वाजता मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटी येथे आले होते. त्यानंतर दुपारी उच्च न्यायालयाने जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मनाई केली आहे.  यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, 

आम्ही न्यायदेवतेचा आदर करतो , न्यायालय आम्हाला न्याय देईल.  आमच्याही वकील बांधवांची टीम तिथे आहे. ते न्यायालयात जातील. आमचे लोकशाही मार्गाने आंदोलन होणार आहे.  लोकशाही पद्धतीने करण्यात येणारे आंदोलन कधीही रोखता येत नाही. सरकारने गोर गरीब लोकांच्या  भावनांशी खेळू नये. शंभर टक्के न्यायालयाकडून आम्हाला परवानगी मिळणार, असा विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. 

 हा सरकारचा खेळ आहे 

लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार न्यायदेवतेने दिलेला आहे. आम्ही त्याच मार्गाने आमरण उपोषण करणार आहोत. मुंबईत आझाद मैदानावर परवानगी दिलेली आहे म्हणूनच तिथे स्टेज तयार करण्याचे काम सुरू आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी देवेंद्र फडणवीस मी आरक्षण घेणार, आम्ही मुंबईला येणार आहे. हा सगळा खेळ सरकारचा आहे, न्यायदेवतेचा नाही, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »