बुलढाणा : जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या कामाचा भार आता कमी झाला आहे, कारण पालकमंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी जिल्ह्याला सहपालकमंत्री मिळाले आहेत. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आता बुलढाणा जिल्ह्याचे सह पालक मंत्री म्हणून मकरंद आबा पाटील यांना सहकार्य करणार आहेत.

बुलढाणा : जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या कामाचा भार आता कमी झाला आहे, कारण पालकमंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्यासाठी जिल्ह्याला सहपालकमंत्री मिळाले आहेत. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आता बुलढाणा जिल्ह्याचे सह पालक मंत्री म्हणून मकरंद आबा पाटील यांना सहकार्य करणार आहेत. याआधी संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, मात्र त्यांच्याकडून ती जबाबदारी काढून घेत त्यांना बुलढाणा जिल्ह्याचे सहपालक मंत्री करण्यात आले आहे. ५६ वर्षीय संजय सावकारे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
२००९ मध्ये संजय सावकारे भुसावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतरही आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेवटच्या एका वर्षासाठी त्यांना कृषी व सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी संजय सावकारे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपकडून २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग ३ विधानसभा निवडणुका ते जिंकले. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी आहे.
