Devotee from Jalna dies at Kedarnath : केदारनाथ येथे रविवार २१ जुलै रोजी सकाळी पावसामुळे दरड कोसळून तीन भावीक ठार तर आठ जखमी झाले. मृतकांमध्ये जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी येथील सुनील महादेव काळे (२४) यांचा समावेश आहे.

जालना : केदारनाथ येथे रविवार २१ जुलै रोजी सकाळी पावसामुळे दरड कोसळून तीन भावीक ठार तर आठ जखमी झाले. मृतकांमध्ये जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी येथील सुनील महादेव काळे (२४) यांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

मृतक काळे यांच्यासोबत पाथरवाला, शहागड, गोंदी येथील परमेश्वर चव्हाण यांच्यासह नऊ व्यक्ती केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते, दरम्यान ही घटना घडली. जिल्हा प्रशासन मंत्रालय नियंत्रण कक्ष आणि रुद्रप्रयाग आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याशी संपर्कात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. सुनील काळे यांचे गोंदी येथे कापड दुकान आहे. सुनील काळेसह गोंदी येथील १० युवक केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. त्यातील सुनील काळे यांचा मृत्यू झाला तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.