खामगाव : भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने मोठी कारवाई करत खामगाव येथील अक्षण क्षत्रुलाल सरवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 500 रुपये दराच्या तब्बल दीड कोटी रुपयांच्या बनावट नोटांचे 30 बंडल जप्त करण्यात आले आहेत.

मात्र, त्याचा साथीदार महेश चोपडे हा कारवाईदरम्यान फरार झाला. दोघे खामगावहून मलकापूरमार्गे भुसावळ स्थानकावर आले होते. पुढे नाशिककडे जाण्याच्या तयारीत असताना, मद्य प्राशनासाठी बाहेर गेले असताना आरपीएफ निरीक्षक पी. आर. मीना यांना गोपनीय माहिती मिळाली. पथकाने शोध मोहीम राबवत सरवणे याला रेल्वे पुलाजवळ ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेत 500 रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल सापडले. यातील बरची नोट खरी असून उर्वरित नोटांवर चिल्ड्रन्स बँक असे छापलेले होते. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे नकली नोटांचा व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.