Rainfall this year : भारतीय हवामान विभागाकडून 13 एप्रिल रोजी नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 92 टक्के पर्जन्य अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाकडून 13 एप्रिल रोजी नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या 92 टक्के पर्जन्य अंदाज जाहीर करण्यात आला आहे. सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम रविचंद्रन यांनी यावर्षीच्या मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या उपस्थित नवी दिल्लीत सोमवारी पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये नैऋत्य मान्सून 2026 चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जेव्हा पावसाचे प्रमाण 90 टक्के ते 95 टक्के असते त्यावेळी सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो.
जून, जुलै, ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार, जून, जुलै, ऑगस्ट पर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात एल निनो परिस्थिती असणार आहे. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भारतीय समुद्रात सकारात्मक परिस्थिती असल्याची माहिती डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिली आहे. त्यामुळे एल निनोच्या नकारात्मक परिणामाला भारतीय समुद्रातील सकारात्मक परिस्थिती अनुकूल करेल. त्यामुळे एल निनोचा परिणाम जाणवणार नाही असे डॉ. एम. मोहापात्रा यांनी सांगितले आहे.


