dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

महामानवाच्या बॅनरची विटंबना, संतप्त नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन | citizens block the road

citizens block the road : वरठाण येथील चौफुलीवर लावण्यात आलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्याची घटना रविवार, 12 एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी वरठाण चौफुलीवर जमा होत रास्ता रोको आंदोलन करीत बॅनरची विटंबना करणाऱ्याचा निषेध केला.

वरठाण :  येथील चौफुलीवर लावण्यात आलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्याची घटना रविवार, 12 एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी वरठाण चौफुलीवर जमा होत रास्ता रोको आंदोलन करीत बॅनरची विटंबना करणाऱ्याचा निषेध केला. तसेच समाजकंटकाविरुध्द बनोटी पोलिस चौकीत सोमवार, 13 एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली आहे. रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने वरठाण चौफुलीवर शुभेच्छाचे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर अज्ञात समाजकंटकाने फाडून विटंबना केली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर संतप्त आंबेडकरी अनुयायांनी वरठाण चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यास रविवारी रात्री साडेदहा वाजेपासून सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक गजानन आरेकर, जमादार संदीप सुसर, राजेंद्र बर्डे, नारायण खोडे यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. जोपर्यंत समाजकंटकाला अटक करीत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार आंबेडकरी अनुयायांनी केल्याने पेच निर्माण झाला होता. पोलिस निरीक्षक पंकज बारवाल यांनी आरोपी समाजकंटकाला शोधून त्याला कठोर शिक्षा दिली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर संतप्त आंदोलकांनी तब्बल वीस तासानंतर आपले आंदोलन मागे घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top