dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जानेफळ येथे तोतया पोलीसांनी सेवानिवृत्त शिक्षकाला पाच लाखाने लुटले

जानेफळ : येथील पोलीस स्टेशन समोर तोतया पोलिसांनी सेवानिवृत्त शिक्षकांची गाडी तपासायच्या नावाखाली उभी करून अंगावरील पाच लाख रुपयांचे सोने लुटल्याची घटना 18 मे रोजी घडली. 

जानेफळ : येथील पोलीस स्टेशन समोर तोतया पोलिसांनी सेवानिवृत्त शिक्षकांची गाडी तपासायच्या नावाखाली उभी करून अंगावरील पाच लाख रुपयांचे सोने लुटल्याची घटना 18 मे रोजी घडली. 

  जानेफळ येथील सेवानिवृत्त शिक्षक मदनलाल लाहोटी जानेफळ बस स्थानकावरून मुंदेफळ रोडने दुचाकीने १८ मे च्या दुपारी जात असताना पोलीस स्टेशन समोर  दोन तोतया पोलीसांनी त्यांना हात दिला मात्र त्यांनी दुचाकी थांबविली नाही. त्यामुळे तोतया पोलीसांनी त्यांचा दुचाकीने पाठलाग करून आम्ही पोलीस वाले आहोत. तुला हात दिला तू गाडी का थांबवली नाही. तुझ्या गाडीमध्ये काहीतरी आहे. आम्हाला गाडी तपासायची म्हणत एक तोतया पोलीस गाडी समोर झाला. दुसऱ्या तोतया पलिसाने लाहोटी यांच्या गळ्यामधील सोन्याचा गोफ व हातामधील सोन्याची अंगठी काढून घेतली. तोतया पोलीस सिविल ड्रेसवर असल्याने सेवानिवृत्त शिक्षकाला संशय येताच तोतया पोलिसांनी जानेफळकडे दुचाकी गाडीने पलायन केले. सेवानिवृत्त शिक्षकाला पाच लक्ष रुपयांनी गंडवल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती ठाणेदार आजिनाथ मोरे यांना मिळताच  त्यांनी त्यांच्या पथकासह शोध घेतला असता आरोपी मिळून आले नाही. जानेफळ पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसून येतात का याचा शोध घेत आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top