छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाने खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून हेक्टरी 3 लाख रूपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूव शेतकऱ्यांच्या खात्यात यातील हेक्टरी फक्त एक लाख रूपये जमा करून दाखवावेत असे खुले आव्हान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी येथे सरकारला दिले.

छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाने खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून हेक्टरी 3 लाख रूपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीपूव शेतकऱ्यांच्या खात्यात यातील हेक्टरी फक्त एक लाख रूपये जमा करून दाखवावेत असे खुले आव्हान शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी येथे सरकारला दिले. पन्नास खोके घेणाऱ्यांकडे शेतकऱ्यांना हेक्टरी पंन्नास हजार रूपये नुकसानभरपाई मागावी लागत असल्याचा टोपणाही त्यांनी यावेळी लगावला.

मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी, 11 ऑक्टोबर रोजी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त कार्यालयावर शेतकऱ्यांचा हंबरडा मोर्चा काढण्यात आला. क्रांती चौक येथून या मोर्चाला प्रारंभ झाला तर गुलमंडी येथे विराट सभा घेण्यात आली. या सभेत माजी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, भर पावसात दसरा मेळावा घेवून दाखवला, आज उन्हाचा कडाका असतांना मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून येऊन शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला आहे. अतिवृष्टी, महापूर आणि नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्ो जीवन उध्दवस्त झाल्याने शेकऱ्यांचा हा रोष आहे. मात्र सरकार कर्जाच्या पुनर्गठणाची भाषा करीत आहे. हेक्टरी पन्नास हजार रूपये नुकसानभरपाईची मागणी असतांना 31 हजार रूपयांत शेतकऱ्यांची बोळवण करीत आहे. हे आम्हाल मान्य नसून जो पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही लढत राहू, वेळ प्रसंगी मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी एकत्र येऊ असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करा महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन, पीकविमा आदी योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्या पुन्हा सुरू करून तुमचीही आनंदाचा शिधा ही योजना नियमित करा आणि महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रूपये जमा करा अशा मागण्या माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी केल्या. माजी विरोधीपक्षनेते आंबादास दानवे, खा. संजय राऊत, खा.ओमराजे निंबाळकर, खा.संजय जाधव, आ.आदित्य ठाकरे, आ. कैलास पाटील, माजी खा. चंद्रकांत खैरे आदींसह प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती.
विरोधी पक्षनेतेपदाचे वावडे का?
मागील काही महिन्यांपासून विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता नाही. सत्ताधाऱ्यांकडून त्यांची निवड का करण्यात येत नाही असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. तुमच्याकडे संपूर्ण बहुमत असेल तर विरोधी पक्षनेतेपदाला घाबरता का? विरोधी पक्षनेतेपदासाठी नियम लागत असतील तर दोन उपमुख्यमंत्रीपदे नियमात बसतात का? त्यांना आम्ही उपमुख्यमंत्री मान्ाण्यास तयार नसल्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.
