छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव येथे खदानीच्या पाण्यात बुडाल्याने दोन बालकांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती गंगापूर पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर किशोर मोईन (15 वर्ष), साहिल संतोष झाल्टे, (15 वर्ष), दोघे रा. थोर वाघलगाव, ता. वैजापूर अशी मयत मुलांची नावे आहेत. गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव येथे खदानीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या मयूर मोईन, साहिल झाल्टे या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांच्या मित्रांनी या घटनेची माहिती मयूर मोईन, साहिल झाल्टे यांच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यावर पद्मपूरा अग्निशन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, लक्ष्मण कोल्हे, अग्निशामक जवान दिनेश मुंगसे, छत्रपती केकान, विशाल घरडे, प्रणाल सूर्यवंशी, सचिन शिंदे, मनसूबराव सपकाळ, प्रशांत गायकवाड आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून पाण्यातून मयूर मोईन, साहिल झाल्टे यांना बेशुध्दावस्थेत बाहेर काढले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद गंगापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.