dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भाजपचाच वरचष्मा; राज्यातील महानगरांचा जनादेश सत्तेला: 45 वर्षांत पहिल्यांदाच मुंबईत कमळ फुलले 

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांपैकी २५ महापालिकेत भाजपसह महायुतीची सत्ता आली आहे. चंद्रपूर, लातूर महापालिकेत काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. अन्य ठिकाणी काँग्रेससह ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबई, पुण्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळावले.

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांमध्ये, भाजप युती त्यापैकी २३ महानगरपालिका या एकतर्फी जिंकल्याचे बघायला मिळाले. सर्वात चर्चेत असलेली महानगरपालिका म्हणजे सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईत 45 वर्षांत पहिल्यांदाच कमळ फुलले. राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली. ८९३ वॉर्डमध्ये एकूण १५,९३१ उमेदवारांनी निवडणूक लढवली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नवी मुंबई, कोल्हापूर, सांगली मिरज कुपवाड , सोलापूर, अहिल्यानगर, नांदेड, जळगाव, जालना, अकोला, पनवेल, मिरा-भाईंदर , धुळे, पिंपरी-चिंचवडसह एकूण 23 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आघाडीवर होता. लातूरमध्ये काँग्रेसला तर परभणीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकहाती सत्ता मिळाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top