dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बुलढाण्यात भव्य आंबा महोत्सव; शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

बुलढाणा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विभाग, आत्मा प्रकल्प आणि महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  आंबा महोत्सव बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे गुरूवार १४ मे रोजी पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. 

बुलढाणा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विभाग, आत्मा प्रकल्प आणि महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  आंबा महोत्सव बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे गुरूवार १४ मे रोजी पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या बागेतील विविध जातींचे आंबे घेऊन या प्रदर्शनात सहभाग घेतला होता.  केशरी, हापूस आणि स्थानिक वाणांच्या आंब्यांचे स्टॉल्स या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले.  कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रात्यक्षिके आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेतला. ३७ पेक्षा अधिक विविध प्रजातीचे आंबे प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांनी आंबा महोत्सवासाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top